अतिवृष्टी ग्रस्त भागात सरसकट पंचनामे करा : घनश्याम शेलार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  नगर -श्रीगोंदा मतदार संघातील आणि नगर तालुक्यातील आगडगाव, देवगाव, रतडगावमध्ये अतिवृष्टी होवून पाच दिवस झाले तरी पंचनामे झालेले नाहीत. राजकीय नेत्यांनीही या भागाकडे दुर्लक्ष केले आहे.

नश्याम शेलार यांनी गावांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना सांगितले.

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तालुक्यात पाच दिवसांपूर्वी अनेक गावांत ढगफुटी झाली.

पूर आल्यामुळे बंधारे फुटले, पुलाचे कठडे तुटले, पुल खचले. उभे पिके वाहून गेली. रतडगाव येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळ वाहतुक दोन दिवस बंद झाली.

देवगाव येथील बंडू गायकवाड यांचे अर्धा एकर क्षेत्र पुर्णपणे वाहून गेले. जनावराचे गोठे पडले. सिताफळाची बाग, झेंडूची शेती, बाजरी, सोयाबीन पीक पुर्णतः उध्वस्त झाले.

रतडगाव स्मशानभूमीचे पत्र्याचे शेड पडले. तहसीलदारांचा आदेश येताच पंचनामा करू, असे सांगितले. शेलार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी पंचनाम्याबाबत तातडीने चर्चा केली. तलाठी यांना उद्यापासून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe