WhatsApp ची ‘ही’ नवीन सेटिंग ऑन करताच गायब होतील पर्सनल चॅट्स, कुणालाही दिसणार नाही चॅटिंग

Ahmednagarlive24 office
Published:

WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग अँप आहे. मेटा कंपनीचे हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. आज बहुतांश लोक व्हाटसएपचा वापर करतात. WhatsApp ने आतापर्यंत अनेक अपडेट्स आणलेले आहेत. नवनवीन फिचर्समुळे हे अँप अत्यंत सुविधायुक्त व शानदार बनलेले आहे.

आता तुमचे पर्सनल चॅट लपवण्यासाठी अर्थात हाईड करण्यासाठी WhatsApp आता एक नवीन फीचर्स आणत आहे. एका रिपोर्टनुसार, चॅट हाईड करण्याचा ऑप्शनचे सध्या टेस्टिंग केली जात आहे. आणि लवकरच अपडेट्सदरम्यान युजर्सना हे ऑप्शन दिले जाऊ शकते. काही रिपोर्टनुसार काही व्हर्जनमध्ये हे फीचर्स टेस्टिंगसाठी सुरु केले आहे. आता लवकरच हे सर्वच व्हर्जनमध्ये वापरले जाऊ शकते.

काही रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे आणि यामुळे युजर्स आपले लॉक केलेले चॅट अधिक चांगल्या प्रकारे हाईड करू शकतील. सध्या, लॉक केलेल्या चॅट लिस्टमध्ये प्रविष्ट होण्यासाठीचा एंट्री पॉइंट नेहमीच चॅट लिस्टमध्ये दिसतो. तेथे जाऊन एखादा तुमच्या लॉक चॅटमध्ये जाऊ शकतो. फोनवर लॉग इन केलेल्या कोणालाही लॉक चॅट मध्ये प्रविष्ट होण्याची परवानगी मिळते.

पण आता आलेल्या नवीन फिचर्सनंतर हे फीचर इनेबल केल्यानंतर युजर्स लॉक केलेल्या चॅट लिस्ट दिसण्यासाठी एन्ट्री पॉईंट्स हटवू शकतील आणि सर्च बारमध्ये सिक्रेट कोड टाकू शकतील. WABetaInfoने म्हटले आहे की, लॉक केलेले चॅट उघडण्यासाठी एन्ट्री पॉईंट हायड फीचर लागू करणे आणि लॉक केलेल्या चॅटच्या यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी सीक्रेट कोड वैशिष्ट्ये एकत्र केल्यास वापरकर्त्यांची गोपनीयता नक्कीच उच्च दर्जाची होऊ शकते.

एका रिपोर्टमध्ये असे सूचित केले गेले आहे की यूजर्सचे संवेदनशील किंवा गोपनीय संभाषण असू शकते की जे त्यांना इतरांपासून लपवून ठेवायचे असते. लॉक केलेल्या चॅटचा एंट्री पॉईंट लपवल्यामुळे फोनमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणालाही लॉक केलेल्या चॅट्स शोधणे अधिक अवघड होते आणि यामुळे या चॅट्सची प्रायव्हसी लक्षणीय वाढेल.

चॅट होईल अधिक सुरक्षित :- सध्या बहुतांश लोक व्हाटसएप वापरतात. ते व्हाट्सएपवर विविध विषयांसंदर्भात चॅटिंग करत असतात. परंतु बऱ्याचदा त्यांचे सिक्रेट चॅट देखील सर्वाना दिसते. परंतु आता हे नवीन फिचर्स जर आले तर प्रायव्हसी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe