Personal Loan: भारीच ! ‘या’ बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदरात उपलब्ध आहे वैयक्तिक कर्ज ; पहा संपूर्ण लिस्ट 

Published on -

 Personal Loan:  आपल्याच्या अचानक काही पैशांची आवश्यकता लागलीतर आपण  मित्रांकडून पैसे मागतो नाहीतर आपली गरज भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतो. वैयक्तिक कर्ज  कोणत्याही सिक्युरिटीशिवाय मिळतो म्हणजेच यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नसते.

मात्र काही दिवसापूर्वी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने अनेक बँकांनी वैयक्तिक कर्जाचे व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे आता वैयक्तिक कर्ज देखील महाग झाले आहे. हे लक्षात घेत आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही बँकांची माहिती घेऊन आलो आहोत ज्या अजूनही कमी व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहेत.

या बँका सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देत आहेत

सर्वात कमी व्याजदराने वैयक्तिक कर्ज देणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा सर्वात कमी व्याजदर आहे. ही बँक 8.9 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. याशिवाय बँक ऑफ इंडियाचा 9.75 टक्के आणि पंजाब नॅशनल बँकेचा 9.8 टक्के वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

या बँकांमध्ये 10-12 टक्के व्याजदर

वैयक्तिक कर्जावर 10-12% व्याजदर देणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा 10.2%, कोटक महिंद्रा बँक 10.25%, इंडियन बँक 10.30%, IDFC बँक, इंडसइंड बँक आणि फेडरल बँक 10.49%, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक यांचा समावेश आहे. 10.55%, ICICI बँक 10.5%, HDFC बँक आणि IDBI बँक 11%, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 11.25% आणि अॅक्सिस बँक 12% इ.

वैयक्तिक कर्जासाठी पात्रता काय आहे

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवावा लागेल. कारण तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळणे सोपे होईल. 700 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि 750 पेक्षा जास्त चांगला मानला जातो.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज त्वरित मिळू शकते. पर्सनल लोन घेताना तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढेच कर्ज घ्या आणि त्याचा कालावधी कमी ठेवा. यामुळे तुम्हाला कर्जाची परतफेड करणे सोपे जाते.

हे पण वाचा :-  TVS Ronin: ‘ही’ खरोखर एक दमदार बाइक आहे का? किंमतीवरून त्याच्या परफॉरमेंसबद्दल जाणून घ्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe