Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलरच्या खाली गेली आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
10 डिसेंबर, शनिवारी पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील, अशी लोकांना अपेक्षा होती, मात्र लोकांच्या पदरी निराशाच पडली. देशातील बहुतांश भागात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या आसपास असताना डिझेलने 90 रुपयांचा टप्पा गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती पाहिली तर कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलरच्या खाली गेली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $76.10 वर पोहोचली आहे आणि WTI क्रूडचा दर $71.02 वर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा परिणाम भारतात होताना दिसत नाही. शनिवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले असून त्यात तेलाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पेट्रोल/लिटर डिझेल
दिल्ली 96.72 89.62
मुंबई 106.31 94.27
चेन्नई 102.63 94.24
कोलकाता 106.03 92.76
नोएडा 97.00 90.14
लखनौ 96.44 89.64
पाटणा 107.24 94.04
22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत :- विशेष म्हणजे 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी करतात. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या मदतीने तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमतही सहज तपासू शकता. तुम्हाला फक्त एसएमएस पाठवायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून 9224992249 या क्रमांकावर तुमच्या शहरातील पेट्रोल पंपाचा कोड पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेजद्वारे तेलाच्या ताज्या किमतींची माहिती मिळेल.