PF Alert : नोकरदार वर्गासाठी पीएफ खाते गुंतवणूक (PF Investment) आणि बचतीचे (PF Savings) एक उत्तम साधन आहे. यातून तुम्ही चांगला परतावाही मिळवू शकता आणि तुमची बचतदेखील वाढते.
परंतु, यासंबंधित अनेक नियम (PF Rules) आहेत. त्यापैकी एक म्हणजे आधारकार्ड लिंक (Aadhaar Card Link) होय.

ते का आवश्यक आहे?
वास्तविक, जेव्हा तुम्ही तुमच्या PF खात्यातून (PF Account) ऑनलाइन पैसे काढता, तेव्हा सर्व प्रक्रियेनंतर, शेवटी तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलेला मोबाइल नंबर एक वेळचा पासवर्ड म्हणजेच OTP येतो.
अशा परिस्थितीत, जर तुमच्या आधार कार्डशी कोणताही मोबाइल नंबर लिंक केला नसेल, तर तुम्हाला पैसे काढण्यात अडचणी येऊ शकतात.
तुम्ही मोबाईल नंबर याप्रमाणे अपडेट करू शकता:-
स्टेप 1
तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल.
स्टेप 2
येथे जाऊन, तुम्हाला सुधारणा फॉर्म घ्यावा लागेल, आणि नंतर तो भरावा लागेल. यामध्ये तुमचे पूर्ण नाव, आधार क्रमांक आणि तुम्हाला आधारशी लिंक करायचा असलेला मोबाइल नंबर टाका.
स्टेप 3
संबंधित प्राधिकरणाकडे फॉर्म सबमिट करा, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि त्यानंतर 24 तासांच्या आत तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारशी लिंक होईल. यानंतर तुम्ही याचा वापर पीएफमधून पैसे काढण्यासाठी करू शकता.