PF UAN : प्रत्येक नोकरदारवर्गासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. नोकरदार पीएफ खात्याबाबत खूप सतर्क असतात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक देण्यात येतो.
हा क्रमांक वापरुन तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. नोकरी बदलत असताना किंवा पीएफची रक्कम काढत असताना यूएएन क्रमांक खूप महत्त्वाचा ठरतो. अनेकदा कागदपत्रे आणि इतर माहिती हरवते. तुमचा UAN नंबर हरवला तर तुम्ही तो ऑनलाईन परत मिळवू शकता.

फॉलो करा या सोप्या स्टेप्स
- जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक जाणून घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला EPFO वेबसाइट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( http://epfindia.gov.in ) वर जावे लागणार आहे.
- यानंतर, तुम्हाला सेवा विभागातील कर्मचार्यांच्या पर्यायावर जावे लागणार आहे.
- आता यानंतर, सर्वात खाली असणाऱ्या सेवा विभागात सदस्य UAN सर्व्हिसवर क्लिक करावे लागणार आहे.
- पुढे तुम्हाला Know your UAN वर जावे लागेल.
- या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांकासह कॅप्चा विचारला जाईल.
- आता तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP येईल, त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा त्यात टाकावा.
- आता पडताळणी केल्यानंतर, या ठिकाणी तुमचे नाव, जन्मतारीख आणि आधार तपशील द्यावा लागणार आहे.
- हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर समजू शकतो.
- तुम्ही सहज लॉग इन करू शकता.
काय आहे UAN क्रमांक?
हा UAN हा 12 अंकी युनिक आयडी असून जो तुमच्या पीएफ खात्यासाठी आहे. हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे जारी करण्यात येईल. त्यामुळे समजा तुम्ही हा नंबर विसरलात तरी काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला हे सहज समजू शकते.