Plane : जर विमान 37000 फूट उंचीवर उडत असेल आणि अचानक पायलट (pilots) झोपी गेले तर काय होईल ? अशीच एक धक्कादायक घटना इथिओपियामध्ये (Ethiopia) घडली आहे.
सुदानमधील (Sudan) खार्तूमहून (Khartoum) अदिस अबाबाला (Addis Ababa) जाणारे इथिओपियन एअरलाइन्सचे (Ethiopian Airlines) दोन्ही पायलट इतके गाढ झोपेत पडले की त्यांना विमानाची लँडिंग लक्षात राहिली नाही. ही धक्कादायक घटना सोमवारी घडली.

ही घटना तेव्हा लक्षात आली जेव्हा फ्लाइट ET343 विमानतळाजवळ आली मात्र लँडिंग केली नाही. तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलने (Air Traffic Control) अलर्ट (alert) पाठवला. मात्र एटीसीचा (ATC) अनेक प्रयत्न करूनही वैमानिकांशी संपर्क होऊ शकला नाही.
ऑटोपायलट बंद केल्यावर अलार्म वाजला
त्याचवेळी वैमानिक झोपेत असल्याने ऑटो पायलटच्या मदतीने विमान हवेत उडत होते. एव्हिएशन हेराल्डनुसार, विमानाने रनवे देखील पार केला होता तेव्हा ऑटो पायलटमोड बंद झाला आणि त्याचवेळी विमानात मोठा अलार्म वाजला, ज्यामुळे दोन्ही पायलट जागे झाले.
यानंतर त्यांनी विमानाचा ताबा स्वतःच्या हातात घेतला आणि सुमारे 25 मिनिटांनंतर, विमान पुन्हा रनवेकडे पोहोचले. चांगली गोष्ट म्हणजे विमान सुरक्षितपणे उतरले आणि कोणालाही दुखापत झाली नाही.
वैमानिकांच्या थकव्याचे कारण?
एव्हिएशन सर्व्हिलन्स सिस्टीमकडून मिळालेल्या माहितीवरूनही या घटनेला पुष्टी मिळाली आहे. विमान रनवेच्या वरून गेला होता . त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केले आहे ज्यामध्ये विमान अदिस अबाबा विमानतळावर फिरत आहे. उड्डाण विश्लेषक अॅलेक्स मॅच्रास यांनीही या घटनेबद्दल ट्विटरवर पोस्ट केले.
त्यांनी हे अतिशय चिंताजनक असल्याचे वर्णन केले आणि वैमानिकांच्या थकव्याला कारणीभूत ठरवले . उल्लेखनीय म्हणजे, अशीच एक घटना मे महिन्यात घडली होती, जिथे न्यूयॉर्क-रोम फ्लाइटचे दोन पायलट जमिनीपासून 38000 फूट उंचीवर झोपी गेले होते.