Play Store : Google (Google) ने पुन्हा एकदा मोठी कारवाई आहे. प्ले स्टोअरवरून 16 धोकादायक ॲप (Dangerous app) हटवली आहेत.
जर ही ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तुम्हीही तुमच्या फोनमधून आत्ताच डिलीट करा. कारण ही ॲप्स (apps) तुमच्या स्मार्टफोनसाठी (Smartphone) खूप धोकादायक आहेत.
रिपोर्टनुसार, हे ॲप्स 20 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहेत. McAfee च्या अहवालानंतर गुगलने हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे. या ॲप्सच्या यादीमध्ये QR कोड स्कॅनर, टॉर्च आणि सर्व प्रकारचे मोजमाप ॲप्स समाविष्ट आहेत.
google ने काढलेल्या ॲप्सची यादी
- BusanBus
- Joycode
- Currency Converter
- High-Speed Camera
- Smart Task Manager
- Flashlight+
- K-Dictionary
- Quick Note
- EzDica
- Instagram Profile Downloader
- Ez Notes
या यादीत फक्त 11 ॲप्स आहेत. इतर 5 ॲप्सचे नाव एजन्सीने दिलेले नाही. मॅकॅफीच्या तपासणीत असे दिसून आले की एकदा फोनवर डाउनलोड केल्यानंतर ते वापरकर्त्यांना बनावट जाहिराती असलेल्या पृष्ठांवर देखील घेऊन जायचे.
या वेबसाइट लिंक्सच्या माध्यमातून युजर्सचा (Users) डेटा चोरीला गेला होता. या ॲप्समध्ये com.liveposting आणि com.click.cas सारखे ॲडवेअर कोड आधीच उपस्थित होते.