ताज्या बातम्या

PM Awas Yojana : खुशखबर! या लोकांच्या खात्यात येत आहेत 1.60 लाख रुपये, यादीत तुमचे नाव आहे का? लगेच तपासा

PM Awas Yojana : केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा फायदा त्यांना होताना आपल्याला दिसत आहे. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे जिचे नाव पंतप्रधान आवास योजना हे आहे.

या योजनेंतर्गत देशातील दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना राहण्यासाठी त्यांना परवडत असणाऱ्या दरात घरे मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून बँकेच्या कर्जावर सबसिडी देण्यात येते. अशातच आता सरकार प्रत्येक गरीबाच्या खात्यात PM आवास योजनेचे 1.60 लाख रुपये टाकत आहे. या यादीत तुमचे नाव आहे का ते लगेच तपासा

सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 80 लाख लोकांना घर देण्याचे लक्ष्य ठेवले असून ज्यांनी अर्ज केला आहे केवळ त्यांनाच घर देण्यात येणार आहे. जर तुम्ही भारताचे रहिवासी असल्यास तुम्ही अजूनही कच्च्या घरात राहत असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

सरकारकडून या योजनेंतर्गत लोकांना पक्की घरे देण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नुकतीच पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर केली आहे. यात अर्ज करणाऱ्या लोकांच्या नावांचा समावेश असून तुम्हीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असल्यास तुम्ही या यादीतील तुमचे नाव तपासू शकता.

काय आहे पात्रता

  • जे लोक भारताचे नागरिक आहेत केवळ तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • तसेच अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती नोकरी करणारा नसावा.
  • समजा एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदाराकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असावी. ज्यात अर्जदाराचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळख प्रमाणपत्र, बँक खाते, फोटो, रेशन कार्ड,पासपोर्ट इ. याशिवाय नाव, राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, गावाचे नाव आदींचा पुरावा गरजेचं आहे.

असे तपासा नाव

समजा तुम्ही या योजनेत तुमचा अर्ज भरला असल्यास आणि तुम्ही यादीत तुमचे नाव तपासण्याच्या विचारात असल्यास तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. एक सोपी प्रक्रिया करून, तुम्ही या योजनेची यादी डाउनलोड करू शकता.

  • सर्वात अगोदर तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर होम पेजवर सिटीझन असेसमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Search Beneficiary या पर्यायावर क्लिक क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन लॉगिन पृष्ठ उघडेल ज्यात अर्जदाराला त्याचे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि इतर सर्व माहिती भरावी लागणार आहे.
  • आता सबमिट बटणावर क्लिक करून शहरी आणि ग्रामीण भागाची यादी तुमच्यासमोर येईल.
  • आता तुमच्या PC मध्ये यादी डाउनलोड करून त्यात तुमचे नाव तपासा.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts