PM Kisan : पीएम किसानच्या 12व्या हफ्त्याला होणार उशीर, आता यादिवशी येणार पैसे….

PM Kisan : मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. या योजनेचे 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढील हफ्ता येणार आहे.

लाभार्थ्यांना 12वा हप्ता या महिन्यात पूर्णपणे अपेक्षित आहे. यापूर्वी ऑगस्ट-जुलैचा हप्ता ऑगस्टच्या सुरुवातीलाच येत होता. 2020 आणि 2021 चे ऑगस्ट-नोव्हेंबरचे हप्ते अनुक्रमे 10 आणि 9 ऑगस्टलाच आले होते, परंतु यावेळी खूप उशीर झाला आहे.

12 वा हप्ता कधी येणार?

आॅगस्ट-नोव्हेंबरच्या 2000 रूपयांची आवक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान असली तरी पूर आणि दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांची यावेळी मोठी प्रतीक्षा आहे. खरं तर, योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.

अनेक वेळा वाढ केल्यानंतर, ई-केवायसीची (e-KYC) अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 रोजी संपली आहे. आता अर्जदार व लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या (applicant and beneficiary documents) पडताळणीचे काम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत हा हप्ता देण्यास विलंब होत आहे.

स्थिती तपासण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा.

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्याय मिळेल
येथे ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
नवीन पृष्ठावर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या 2 क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.

काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?

पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबांसाठी आहे. कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले. योजनेच्या नियमांनुसार, पीएम किसानचे पैसे शेतकरी कुटुंबाला मिळतात, म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच्या खात्यात 6000 रुपये वार्षिक 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe