PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14 व्या हप्त्यापूर्वीच खात्यात जमा होणार 15 लाख रुपये, असा करा अर्ज

Ahmednagarlive24 office
Published:

PM Kisan FPO Yojana : सरकार आता देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक करत आहे. पीएम किसान एफपीओ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 15 लाख रुपयांपर्यंतची मदत देत आहे.

परंतु, जर तुम्हाला याचा फायदा घेण्यासाठी एक छोटेसे काम करावे लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 14 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख येतील. काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक योजना म्हणजे ‘PM किसान FPO योजना’ होय.

शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना एकूण 15 लाख रुपये देते.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

केंद्र सरकार शेतीसोबतच शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठीही प्रवृत्त करत असून आता कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 15 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये देण्यात येतात.

परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करावी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी निगडित उपकरणे, खते, बी-बियाणे आणि औषधे खरेदी करणे खूप सोपे होणार आहे.

असा करा अर्ज

  • त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • आता होम पेजवर दिलेल्या FPO पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आता नोंदणी पर्यायावर क्लिक करा
  • तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल
  • या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
  • यानंतर पासबुक अपलोड करून किंवा आयडी स्कॅन करा
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

असे करा लॉग इन

  • तुम्हाला अगोदर राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या FPO पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • नंतर login वर क्लिक करावे लागणार आहे.
  • लॉगिन फॉर्म उघडल्यानंतर वापरकर्तानाव संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागणार आहे.
  • यासह तुम्ही लॉगिन कराल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe