PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12व्या हप्त्याची (12th installment) वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. दिवाळीपूर्वी (Diwali) मोदी सरकार (Modi government) लवकरच देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
उशीर का होतोय ?
आम्ही तुम्हाला सांगतो की, योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा आणि आजच तुमचे ई-केवायसी पूर्ण करा.
तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा
सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
होम पेजवर मेनूबारवर जा आणि ”Farmer Corner’ वर जा.
येथे Beneficiary List वर क्लिक/टॅप करा.
हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल.
येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा. यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्यामध्ये ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडा.
यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर येईल.
योजना काय आहे?
आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम किसान योजनेंतर्गत सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. आता 12वा हप्ता लवकरच येणार आहे.