PM Kisan Yojana : देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील 13व्या हप्त्यासंदर्भात मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ही बातमी, जाणून घ्या…
13वा हप्ता कधी येणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात किंवा जानेवारीच्या कोणत्याही दिवशी रिलीज केला जाऊ शकतो. पुढील हप्ता 15 जानेवारीपूर्वी जारी केला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये देते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
त्वरित eKYC करून घ्या
तुम्हालाही 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ताबडतोब eKYC करावे लागेल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला PM किसान पोर्टल किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन eKYC करून घ्यावे लागेल.
आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टल किंवा कृषी विभागाकडून ई-केवायसी करण्यासाठी सतत संदेश पाठवले जात आहेत, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी 13 किंवा डिसेंबर-मार्चच्या हप्त्यापासून वंचित राहू नये.