PM Modi Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन (PM Modi Mother Heeraben Demise News) यांचे शुक्रवारी पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे.
हीराबेन यांना बुधवारी सकाळी काही प्रकृती समस्यांमुळे अहमदाबादमधील ‘यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले होते.
हॉस्पिटलने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, “यूएन मेहता हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 30 डिसेंबर 2012 रोजी पहाटे 3.30 वाजता हिराबेन मोदी यांचे निधन झाले.”
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी बुधवारी दुपारी दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. आईला इथे हॉस्पिटलमध्ये भेटले होते. तासाभराहून अधिक काळ ते रुग्णालयात थांबले. हीराबेन, ज्यांना हीरा बा म्हणूनही ओळखले जाते. पंतप्रधान मोदींचे मोठे बंधू सोमाभाई हेही त्यांच्या निधनावेळी रुग्णालयात उपस्थित होते.
पीएम मोदींनी एक भावनिक ट्विट
आई हिरा बेन यांच्या निधनाची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे दिली. त्यांनी लिहिले, ‘एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावतो… आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे. पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंतिम संस्कारात पंतप्रधान मोदींनीही आईला खांदा दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. हीराबेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर शहराजवळील रायसन गावात राहत होत्या.
पंतप्रधान जेव्हाही गुजरातला जायचे तेव्हा ते नियमितपणे रायसनला भेट देत असत आणि त्यांच्या बहुतेक गुजरात दौऱ्यांमध्ये ते त्यांच्या आईसोबत वेळ घालवत असत.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधान मोदी आज कोलकाता दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींना आज कोलकाता येथे जायचे होते. येथे पंतप्रधान हावडा न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेन आणि मेट्रो लाईनचे उद्घाटन करणार होते. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी होणार होती.
हा त्यांचा पहिला नियोजित कार्यक्रम होता. पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.