तुम्ही तुमचा मेसेज याप्रमाणे पोहोचवू शकता:-
नंबर 1
तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी म्हणजेच PMO शी त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://www.pmindia.gov.in/en/ ला भेट देऊ शकता.

नंबर 2
तुम्हाला तुमचा मुद्दा देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नमो अॅपची (NaMo app) मदत घेऊ शकता. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअरवरून (play store) डाउनलोड करू शकता.
नंबर 3
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. फेसबुक अकाउंट https://www.facebook.com/narendramodi, Twitter: https://twitter.com/narendramodi आणि Instagram: https://www.instagram.com/narendramodi/?hl=en द्वारे देखील पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकतात
नंबर 4
तुम्हाला तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी 91-11-23019545, 23016857 या फॅक्सद्वारे संपर्क साधू शकता.
तुम्ही पीएमओच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहू शकता “नरेंद्र मोदी वेब इन्फॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल, नवी दिल्ली – 110011” याशिवाय तुम्ही [email protected] वर ईमेल देखील करू शकता.