Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू येथे येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे.
यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावरून झालेली टीका आणि जवळ आलेली आषाढी वारी लक्षात घेता तीन ऐवजी केवळ एकच दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी देहूला येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने १२ जून पासून सकाळी ८ ते १४ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवले जात असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. याची दखल घेत भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे आता फक्त एकच दिवस म्हणजेच १४ जून रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.