PM Mudra Yojana : मुद्रा योजनेत 4500 रुपये दिल्यावर केंद्र सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Published on -

PM Mudra Yojana : केंद्र सरकारने अनेकांचे आर्थिक हित लक्षात घेत लहान व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लहान व्यवसाय करणाऱ्यांना अल्प रकमेचे कर्ज देण्यात येते.

मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असे सांगण्यात येत आहे कि 4500 रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील एक पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे.

या पत्रात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे नाव लिहिले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही छापण्यात आला आहे. तसेच, या पत्रात, पडताळणी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून 4500 रुपये भरल्यानंतर पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांच्या कर्जाचा दावा केला जात आहे.

सरकारने मेसेज फेक असल्याचे सांगितले

मात्र, पीआयबीला त्यांच्या तथ्य तपासणीत हे मंजूरी पत्र बनावट असल्याचे आढळले आहे. यासोबतच पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, अर्थ मंत्रालयाने असे कोणतेही पत्र जारी केले नाही. अशा स्थितीत पत्रात करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.

पीएम मुद्रा योजना काय आहे  

मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्कही घेतले जात नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो. योजनेअंतर्गत कोणताही निश्चित व्याजदर नाही. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12% असतो.

PM Modi Good news for many 2 thousand will be deposited in the account

या योजनेत 3 प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे

1. शिशु कर्ज: 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज शिशू कर्जाअंतर्गत दिले जाते.

2. किशोर कर्ज: किशोर कर्जाअंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

3. तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

हे पण वाचा :-   SIP Calculator:  गुंतवणूकदार होणार मालामाल! 10 हजारांच्या SIP मधून मिळणार 10000000 रुपये ; जाणून घ्या कसा होणार फायदा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe