PMSBY Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा देशातील करोडो नागरिकांना फायदा होत आहे. सरकारकडून देशातील नागरिकांना अगदी कमी दरात विमा सुरक्षा कवच पुरवले जात आहे.
देशातील दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांकडून देखील त्यांच्या विमा प्रीमियममध्ये वाढ केली जात आहे.

विमा कंपन्यांकडून त्यांच्या विमा पॉलिसीमध्ये वाढ केली जात असल्याने विमा घेणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र सरकारकडून देशातील नागरिकांना अगदी कमी रुपयांमध्ये विमा पॉलिसीचा लाभ दिला जात आहे.
सरकारकडून देशातील नागरिकांना आयुर्विमा पॉलिसी दिली जात आहे. तसेच ही विमा पॉलिसी नागरिकांना अगदी कमी कमी प्रीमियमवर दिली जात आहे. केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये नागरिकांना 20 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सरकारची ही विमा पॉलिसी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल जाणून घेऊया
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देशातील 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेसाठी तुम्हाला वार्षिक फक्त 20 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही तुमची ही पॉलिसी बँक खात्याशी लिंक केली तर वार्षिक प्रीमियम तुमच्या खात्यातून कापून घेतला जाईल. विमा धारकाचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम वितरित केली जाते.
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2015 साली सुरु करण्यात आली आहे. ही योजना २ लाख रुपयांचा अपघात सुरक्षा कवच प्रदान करते. या विमा सुरक्षा योजनेचा प्रिमीय वार्षिक 12 रुपये होता मात्र आता 1 जून 2022 पासून 20 रुपये झाला आहे. कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना आणि देशातील जनतेला सुरक्षा कवच पुरवणे हा या योजनेचा हेतू आहे.
अर्ज कसा करायचा?
जर तुम्हालाही केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा सुरु करायची असेल तर तुम्ही कोणत्याही बँक शाखेला भेट देऊन ही योजना सुरु करू शकता. बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना निवडू शकता. तसेच तुम्ही विमा एजंटकडे जाऊन देखील योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता.