अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीच्या काळात आपलं कर्तृत्व चोखपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांना राज्य सरकारने मात्र केवळ 750 रूपये भेट जाहीर केली आहे.
राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अनेकजण नाराज असल्याचं दिसून येतंय.

कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस पोलिसांनी राज्यात जागता पहारा दिला. कोरोना सारख्या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये डॉक्टरांचा आणि पोलिसांचा समावेश आहे.
त्या पोलिसांची राज्य सरकारने खिल्ली उडवली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन पोलिसांची चेष्टा केल्याचं पहायला मिळत आहे.
दिवाळीच्या काळात आपलं कर्तृत्व चोखपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांना राज्य सरकारने मात्र केवळ 750 रूपये भेट जाहीर केली आहे.
राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली आहे. पोलिसांना मात्र तुटपूंजी मदत जाहीर केली आहे.
यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे.
मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमध्ये त्याच्या नावे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 750 रूपये इतक्या शुल्लक रक्कमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असणाऱ्या संचित निधीमधून करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम