अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणार्या अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
येथील तोफखाना पोलिसांनी लाखो रूपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लखों रूपयांची देशी व विदेशी अशी अवैध व बनावट दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती.
अनेक वर्षांपासून हा साठा पडून होता. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे.
सुमारे आठ ते दहा लाख रूपयांची बनावट व विक्रीसाठी चाललेली पकडलेली दारू नष्ट करण्यात आल्याचे निरीक्षक गडकरी यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम