भाजप कार्यकर्त्यांना पोलिस म्हणाले, तुम्ही आडदांड! हमीदाराशिवाय…

Published on -

Maharashtra news : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीरसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र, यातील पोलिसांच्या भाषेवर कार्यकर्तांनी आक्षेप घेतला आहे.

ठाकरे यांच्या सभेच्यावेळी स्थानिक पाणी प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाणी प्रश्नावरून ४ एप्रिलला भाजपने आक्रमक आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्यामध्ये म्हटले आहे. तुम्ही आडदांड व कोणतीही परवानगी नसताना अडथळा निर्माण करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याचे स्वभावाचे दिसून येता. आगामी काळात तुमच्याकडून सदर कारणावरून वाद होऊन त्यातून एखादा शरीराविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते, वगैरे रिपोर्टमध्ये नमूद आहे.

यावरून तुम्ही वरील प्रमाणे कृत्य केल्याबाबत आमची खात्री झाली आहे. तुमचेकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून त्यातून तुम्ही राहात असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, असे आमचे मत झाले आहे. त्यामुळे तुम्हास हमीदाराशिवाय मोकळे सोडणे उचित वाटत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe