अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याची माहिती प्रसार माध्यमांना मिळाली पण पोलिसांना कशी नाही? याची चर्चा सुरू आहे.
मात्र, यासंबंधी पोलिसांच्या विभागीय चौकशीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. या आंदोलनाची पोलिसांना दुपारी बारा वाजताच माहिती मिळाली होती.
मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत:ही हालचाल केली नाही, किंवा वरिष्ठांनाही कळविले नाही, असे चौकशीत आढळून आले आहे.
मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्यारेलाल राजभर यांना दुपारी १२ वाजताच या आंदोलनाची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी काहीही केले नाही.
चौकशी समितीने आपला अहवाल गृह विभागाला सादर केला. त्यानंतर राजभर यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्या परिमंडळाचे उपायुक्त योगेश कुमार यांचीही बदली करण्यात आली आहे.
एवढ्या गंभीर प्रकाराची माहिती पोलिसांनी तीन ते साडेतीन तास आधीत मिळाली असूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने याची वेगळी चर्चाही सुरू झाली आहे.