Post Office : तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना माहिती असतील. यातील काही योजनांचा तुम्ही लाभही घेत असाल. दरम्यान हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस हे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी योजना आणत असते.
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये सुरक्षित परतावा मिळतो. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. यापैकीच एक म्हणजे सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना होय. देशातील करोडो लोकांनी या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.
हे लक्षात घ्या की ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात असल्याचं योजनेच्या नावावरून स्पष्ट होत आहे. नियतकालिक परतावा शोधणाऱ्यांसाठी ही योजना योग्य आहे. तसेच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर सर्व्हायव्हल बेनिफिट्स बंद होणार आहेत, अशा परिस्थितीत दावेदारांना संपूर्ण विम्याची रक्कम देण्यात येते.
समजा या योजनेच्या गुंतवणूकदाराला ही मनी-बॅक पॉलिसी असल्याचा अतिरिक्त लाभ मिळाल्यास, तर तुम्हाला या योजनेतून मुदतपूर्तीपूर्वीच पैसे मिळतील.
वयाची अट
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 19 ते 45 वर्ष इतके असावे. या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूकदारांना पॉलिसीच्या परिपक्वतेवर बोनस मिळत आहे. या योजनेला 1995 मध्ये सुरू झाली. समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर, त्याच्या नॉमिनीला बोनससह संपूर्ण विम्याची रक्कम देण्यात येते.
यात तुम्ही कमीत कमी 19 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकदाराला ठराविक वर्षांनी पैसेही परत दिले जातात. समजा, जर तुमची पॉलिसी 15 वर्षांसाठी चालत असल्यास 20-20 टक्के फॉर्म्युलावर आधारित विमा रक्कम सहा, नऊ आणि बारा वर्षांनंतर उपलब्ध करण्यात येईल.
ज्यावेळी तुम्ही मॅच्युरिटीवर येता, तेव्हा तुम्हाला बोनस आणि उर्वरित 40% मूळ रकमेची रक्कम देण्यात येते. तसेच, तुम्ही 20 वर्षांसाठी विमा खरेदी केला तर, तुम्हाला दर आठ, बारा आणि सोळा वर्षांनी 20% रक्कम परत दिली जाते. तसेच मुदतपूर्तीवर, बोनस आणि शिल्लक 40% रक्कम वितरीत करण्यात येते.
पहा उदाहरण
उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास त्याला 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्हाला यात 2853 रुपयांचा हप्ता म्हणजे प्रत्येक दिवसाला एकूण 95 रुपये महिन्याला जमा करावे लागणार आहेत.
जर तुम्ही तीन महिन्यांचा आधार घेतल्यास त्यासाठी तुम्हाला 8,850 रुपये जमा करावे लागणार आहेत, तसेच 6 महिन्यांसाठी तुम्हाला 17,100 रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतर, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर सुमारे 14 लाख रुपये मिळू शकतात.