Post Office : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी गुंतवणूक योजना आणते. सध्या पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला गुंतवणूक करता येईल. यात गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. शिवाय त्यांना जास्त परतावा मिळतो.
जर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता पोस्ट ऑफिसचे व्याजदर वाढले आहे. त्यामुळे आता जास्त कमाई करता येईल. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.

सरकारकडून त्यामध्ये एकूण 20 बेसिस पॉइंट्सची वाढ केली असून समजा तुम्ही आता 2000 रुपये, 3000 रुपये किंवा 5000 रुपयांची मासिक आरडी सुरू केली तर तुम्हाला नवीन व्याजदरासह किती परतावा मिळू शकतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.
2,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती होईल फायदा?
समजा तुम्ही 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 2,000 रुपयांची आरडी सुरू करणार असल्यास तुम्ही एका वर्षात रु. 24,000 म्हणजेच एकूण 5 वर्षात रु. 1,20,000 गुंतवू शकता. अशा स्थितीत तुम्हाला नवीन व्याजदरासह म्हणजेच ६.७% व्याजासह २२,७३२ रुपये मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, 5 वर्षांनंतर, तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्रित करून तुम्हाला एकूण 1,42,732 रुपयांचा परतावा मिळेल.
3,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती होईल फायदा?
समजा तुम्हाला प्रत्येक महिन्याला रु. 3,000 चा RD सुरू करायचा असल्यास तर तुम्ही एका वर्षात रु. 36,000 आणि 5 वर्षात एकूण रु. 1,80,000 ची गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला 34,097 रुपये व्याज म्हणून मिळतात आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,14,097 रुपये मिळतात.
5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती होईल फायदा?
तुम्ही प्रत्येक महिन्याला रु. 5,000 ची आरडी सुरू केली तर तुम्ही 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 6.7% दराने 56,830 रुपये व्याज मिळू शकते. अशा प्रकारे, तुम्हाला परिपक्वतेवर 3,56,830 रुपयांचा परतावा मिळेल.
तीन महिन्यांनी व्याजात बदल
सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारचे वित्त मंत्रालय प्रत्येक तीन महिन्यांनी लहान बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजाचा आढावा घेत असते. यानंतर पुढील तिमाहीसाठी व्याज सुधारित केले जातात. सणासुदीच्या काळात सरकारने 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदरात बदल केला असून उरलेल्या योजनांवर जुने व्याजदर लागू राहतील.