Post Office : भारीच.. करा ‘या’ पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक, मिळेल 16 लाखांचा शानदार परतावा

Ahmednagarlive24 office
Published:

Post Office : बँका प्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही जर तुम्ही खाते उघडले तर अनेक सुविधा देण्यात येतात. पोस्ट ऑफिसमध्ये बंपर परतावा मिळतो. शिवाय या योजनांमध्ये कोणतीही कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

तुम्ही आता पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खात्यात अवघ्या 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. ही एक छोटी बचत योजना असून तुम्हाला तुमच्या बजेटनुसार या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत पाच वर्षांसाठी खाते उघडण्यात येते.

किती मिळते व्याज ?

सध्या आवर्ती ठेव योजनेवर ५.८% व्याज देण्यात येत आहे. हा दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाला आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित केले जाते. नुकत्याच निश्चित केलेल्या दरांत आवर्ती ठेव योजनेवर पूर्वीप्रमाणेच व्याज देण्यात येत आहे.

तर मिळतील 16 लाख रुपये

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर, तुम्हाला 10 वर्षांनंतर 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.

हे लक्षात ठेवा तुमच्या आरडी खात्यात वेळेवर पैसे जमा करावे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दंड भरावा लागणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही सलग ४ वेळा हप्ते जमा केले नाहीत तर तुमचे खाते बंद करण्यात येईल.

करपद्धत

आवर्ती ठेवीतील गुंतवणुकीवर टीडीएस कापण्यात येतो जर ठेव रक्कम 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास 10% वार्षिक दराने कर आकारण्यात येतो. आरडीवर मिळणारे व्याज करपात्र असून मुदतपूर्तीवर मिळालेल्या रकमेवर कर आकारण्यात येत नाही. ज्या गुंतवणूकदारांना कोणतेही करपात्र उत्पन्न नसेल तर ते FD च्या बाबतीत फॉर्म 15G भरून TDS सवलतीचा दावा करता येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe