पोस्टाची सुपरहीट योजना : इथे गुंतवलेले पैसे काही महिन्यातच होतात दुप्पट !

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरेतर, गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय कडून सातत्याने रेपो रेटमध्ये कपात केली जात असून याचा परिणाम म्हणून देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉझिट व्याजदर घटवले आहे.

यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय. देशभरातील सर्वच खाजगी आणि सरकारी बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर कमी केले असल्याने आता अनेक जण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

दरम्यान जर तुम्हाला ही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेची माहिती सांगणार आहोत जिथे तुमचे पैसे थेट दुप्पट होणार आहेत. पोस्टकडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी योजना चालवल्या जातात.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, टाईम डिपॉझिट अशा असंख्य योजना पोस्टाकडून सुरू आहेत. पोस्ट ऑफिस ने किसान विकास पत्र नावाची पण एक योजना सुरू केली आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे गुंतवलेले पैसे मॅच्युरिटी वर दुप्पट होतात. आज आपण याच किसान विकास पत्र योजनेबाबत माहिती पाहूयात.

कसे आहे व्याजदर

पोस्ट ऑफिसने 18 वर्षांवरील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे. यात कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तसेच इथे कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाहीये म्हणजेच गुंतवणूकदार त्याच्या इच्छेप्रमाणे येथे पैसा लावू शकतो.

यावर गुंतवणूकदारांना 7.5% वार्षिक व्याजदर ऑफर केला जात आहे. या योजनेची आणखी एक विशेषतः अशी की येथे गुंतवलेले पैसे कधी पण काढता येतात. काही योजनांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर लवकर पैसे काढता येत नाही.

पण या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर अडीच वर्षांचा काळ पूर्ण झाला की गुंतवणूकदारांना आपले गुंतवलेले पैसे काढता येतात. या योजनेत नव वर्ष आणि सात महिने कालावधीसाठी गुंतवणूक केली की गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतात.

समजा तुम्ही या योजनेत आज अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला नव वर्ष आणि सात महिने पूर्ण झाल्यानंतर एकूण पाच लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला फक्त व्याज म्हणून येथून अडीच लाख रुपयांची कमाई होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe