Post Office: पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना करणार तुम्हाला लखपती ! फक्त करा 50 रुपयांची गुंतवणूक ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published on -

Post Office : पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी नेहमीच एका पेक्षा एक नवीन नवीन योजना आणत असतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करून आता पर्यंत अनेकांना भरपूर आर्थिक लाभ मिळाला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व गुंतवणूक सुरक्षित असल्याने लोकांना चांगला परतावा मिळत आहे.

तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसे गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एक जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही चांगला नफा मिळवू शकतो.

35 लाखांचा बंपर परतावा

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजने’बद्दल. इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.

गुंतवणुकीचे नियम जाणून घ्या

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.

प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सूट मिळते.

या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.

ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ते सरेंडरही करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

किती फायदा होईल?

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

हे पण वाचा :- Sankashti Chaturthi 2022: ‘या’ दिवशी असणार संकष्टी चतुर्थी व्रत, जाणून घ्या तिथी आणि शुभ वेळ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe