अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- कुक्कुटपालन व्यवसायिकांना कुक्कुटपालनामध्ये वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते तर कधी कोरोना चिकनच्या आफवेमुळे तर कधी बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा गेल्या काही दिवसात अडचणीत आला होता.
तर आता कुकूटपालन व्यवसाय आता कुठे रुळावर येत होता तेव्हाच कुकूटपालन व्यवसायावर नवे संकट उभे राहिले असून पशूंना लागणाऱ्या खाद्य दरात तब्बल दुपटीपेक्षा अधिकची वाढ झालेली आहे.
त्यामुळे कुकुट पालन व्यवसायीकाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पशु ला लागणाऱ्या खाद्यात मुख्यतःसोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी आणि शिंपले यासारख्याचा वापर केला जातो.
मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या खाद्यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा हा प्रश्न कुकुट पालक व्यवसायिकांना पडला आहे.
पशूंना लागणाऱ्या खाद्य दरात वाढ झाल्याने आता प्रति अंड्या मागे 1 रुपया 25 पैशाचे नुकसान सहन करण्याची वेळ कुकुट पालकांवर आली असून सध्या प्रति किलो 28 रुपये पर्यंत खर्च येत आहे. तर दहा हजार पक्ष्यांमागे रोज 20 हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे .
अंड्याचा विक्री दर वाढवावा अन्यथा पशुखाद्य वर अनुदान तरी द्यावे अशी मागणी शासनाकडे कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.