Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
PPF Account

PPF Account : गुंतवणूकदारांनो… बनायचे असेल करोडपती तर अशा प्रकारे करा गुंतवणूक, वाचा सविस्तर

Sunday, September 17, 2023, 3:07 PM by Ahilyanagarlive24 Office

PPF Account : तुम्हाला करोडपती बनायचं असेल आणि तुमचे उत्पन्न खूप कमी असेल तर अजिबात काळजी करू नका. जर तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीचा योग्य मार्ग माहित असेल तर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

कमाई करण्यासोबत योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे असते. अनेकजण PPF मध्ये गुंतवणूक करतात. कारण या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. शिवाय त्यांना उत्तम परतावा मिळतो. तुम्ही देखील PPF मध्ये पैसे गुंतवून करोडो कमावू शकता.

PPF Account
PPF Account

अशी आहे पीपीएफ योजना

गुंतवणूकदारांना पीपीएफ योजनेच्या गुंतवणुकीवर शानदार व्याज मिळते. सध्या या योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. इतकेच नाही तर या खात्यातील मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असून जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती 15 वर्षांनी मॅच्युरिटी रक्कम काढू शकतात किंवा तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 5 वर्षांसाठी वाढवू शकता.

गुंतवणूक

लोकांना एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची रक्कम जमा करता येते. इतकेच नाही तर तुम्हाला या योजनेत कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पीपीएफ खात्यात नियमित गुंतवणूक केली तर तुम्ही पीपीएफ खात्यातून करोडपती होऊ शकता.

समजा जर तुम्‍ही PPF खात्‍याद्वारे लखपती होण्‍याचे लक्ष्‍य ठेवत असाल तर तुम्‍ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्हाला एका आर्थिक वर्षात या योजनेत रु. 1.5 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. तसेच तुमच्या गुंतवणुकीचा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

असा जमा करा कोट्यवधी रुपये

अशा परिस्थितीत, समजा एखाद्या व्यक्तीने जर 7.1 टक्के व्याजाने 25 वर्षे सतत 1.5 लाख रुपायांची गुंतवणूक केली तर 37.5 लाख रुपये खातेधारकाद्वारे 25 वर्षांसाठी त्यात जमा केले जातात. या पैशावर गुंतवणूकदाराला 65,58,015 रुपये व्याज इतके मिळेल. ज्यावेळी या दोन रकमा एकत्रित जोडल्या जातात, त्यावेळी 25 वर्षांच्या परिपक्वतेवर 1,03,08,015 रुपये मिळतात. अशा परिस्थितीत तुम्हाला पीपीएफ खाते करोडपती बनवू शकते.

Categories ताज्या बातम्या Tags Government schemes, Investment, Investment in PPF, PPF, PPF Account, PPF investment
Inspirational Story: एका छोट्या व्यवसायापासून सुरुवात आणि आता देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीचे चेअरमन! वाचा या उद्योगपतीचा प्रवास
Jio Recharge Plan : 500Mbps इंटरनेट स्पीड असणारे ‘हे’ आहेत जिओचे शानदार प्लॅन्स, किंमतही आहे कमी
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress