PPF : शानदार योजना! अवघ्या 417 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा करोडोंचा परतावा, कसे ते जाणून घ्या..

Ahmednagarlive24 office
Published:

PPF : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीपीएफ हा गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला मार्ग मानण्यात येतो. ही एक अशी योजना असून ज्यात तुम्हाला खात्रीशीर परतावा देण्यात येतो तर कर लाभ, करात सूट आणि जमा करण्यात आलेल्या भांडवलाची हमी सुरक्षा मिळते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला करोडपती होण्याची संधी देत असून त्यासाठी तुम्हाला खात्यात नियमितपणे पैसे टाकावे लागणार आहेत. आता तुम्ही यामध्ये दर महिन्याला 417 रुपये गुंतवले तर तुम्हाला करोडोंचा जबरदस्त परतावा मिळेल.

पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणुकीचे खूप फायदे आहेत यामध्ये तुम्हाला इतर बचत योजनांपेक्षा चांगले व्याज दर मिळू शकते. तुम्हाला आता कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडता येईल.

जाणून घ्या व्याजदर

हे लक्षात घ्या की पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरील व्याज दर प्रत्येक तिमाहीत केंद्र सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येतो. केंद्र सरकारकडून या तिमाहीसाठी म्हणजेच 1 एप्रिल 2023 साठी PPF च्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळेच या तिमाहीतही ग्राहकांना छोट्या बचत योजनेवर 7.1 टक्के व्याजदर दिले जाणार आहे.

या लोकांना पीपीएफमध्ये गुंतवणूक करता येत नाही

आता तुम्हाला या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येईल, तर सरकार तुम्हाला यात गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय देत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकता किंवा तुम्हाला सर्व पैसे एकरकमी जमा करता येईल. तर नियमांनुसार, या योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते, सरकार कोणत्याही अनिवासी भारतीयाला यात गुंतवणूक करण्यास परवानगी देत ​​नाही.

असे बना करोडपती

जर तुम्ही 25 वर्षे प्रत्येक महिन्याला 12500 रुपये गुंतवले तर तुम्हाला करोडपती होता येईल. अशी गुंतवणूक करून, तुम्ही एका वर्षात एकूण 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. त्यामुळे जर 25 वर्षांत तुम्ही 37,50,000 रुपये गुंतवले यावर 65,58,015 रुपयांचे व्याज 7.1 टक्के दराने देण्यात येईल. म्हणजे 25 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.03 कोटी रुपयांचा निधी असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe