अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :-अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केली जातात.
पण काही पात्र शेतकऱ्यांना त्रुटी अभावी या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी 25 मार्च रोजी गावपातळीवरील शिबिराचे आयोजन करू योजनेसंदर्भातील त्रुटी दूर करून त्यांना या योजनेपासून मिळणारा लाभ घेता येणार आहे.
तर या संदर्भात नागपूर जिल्ह्यामध्ये 25 मार्च रोजी त्रुटी आभावी पात्र शेतकऱ्या ची नावे नोंदवून त्या शेतकऱ्यांच्या योजनेसंदर्भात असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी गावोगावी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पात्र शेतकऱ्यांनी शिबिरात येताना स्वत:चे बँक पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व 8-अ चा उतारा आदी कागदपत्रे गावासाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे द्यावी लागणार आहेत.
परंतु काही लाभार्थी ट्रान्झाक्शन फेल्युअर, आधार कार्ड दुरुस्ती, पीएफएमएसने नाकारणे आदी कारणांनी लाभापासून वंचित आहेत. त्यांना या शिबिराच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू करण्यात आली. तर या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे वर्षात 3 हप्ते असे सहा हजार रुपयांचा लाभ प्रती वर्षी दिला जात आहे. नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.