Prashant Jagtap : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत.
यामुळे आता मनसेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यावर मनसे आता काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली. यामुळे आता येणाऱ्या काळात देखील मनसेची भाजपसोबत युती होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही. मात्र, मनसे मतदानामध्ये भाजपला मदत करणार असल्याची चर्चा मनसे आणि भाजपच्या वरिष्ठ स्तरावर झाली आहे. यामुळे याचा भाजपला फायदा होणार आहे.
दरम्यान, यावरून मनसेवर टीका देखील केली जात आहे. भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही. मात्र, थेट मतदानामध्ये मदत करणार अशी भूमिका मनेसेने घेतल्यामुळे तुम लढो, हम मनसे कपडे संभालते है, असा टोला अनेकांनी लगावला आहे.