पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण दरेकर भडकले; म्हणाले, चोर दरोडे सारखं आम्हाला नेलं, घातपाताचा डाव…

Published on -

मुंबई : भाजपने (BJP) आज मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे मोठे नेते मोर्चाला उपस्थित होते. या आंदोलनामध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे ही उपस्थित होते.

पोलिसांनी (Police) मेट्रो सिनेमा येथे भाजपचा धडक मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. नंतर या भाजप नेत्यांना सोडून देखील देण्यात आले आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. आम्हाला बसवून ठेऊन वरिष्टांशी चर्चा सुरु होती. आम्हाला अटक दाखवून त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलं. जनतेच्या दबावाची भीती होती त्यामुळं पोलिसांना आम्हाला सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं,

पोलिसांचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका आम्हाला होती. जसं नाक्यावरचे चोर दरोडेखोर यांना पकडतात तसे आम्हांला नेण्यात आलं, 5 मीटरचं अंतर पाउणतासावर गेलं.

आम्हाला घेऊन जाताना मध्येच ब्रेक मारणं वैगरे असे प्रकार सुरु होते. आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते, असा अनुभव प्रविण दरेकर यांनी सांगितला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ते सरकारच्या प्रेशर खाली काम करत आहेत. आता गावा गावात मोर्चे निघतील.

मंत्र्यांच्या घरी जाऊ मात्र मागणीपासून मागं हटणार नाही. आम्ही हा संघर्ष अजुन तीव्र करु आणि सरकारला नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा लागेल. असे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe