Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार सह केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भाईओ और बहनौ म्हणत जळमळीत टीका केली आहे.
सुषमा अंधारे या सतत शिंदे गट आणि भाजप वर टीका करण्यासाठी सक्रिय असतात. ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून आता सुषमा अंधारे यांना ओळखले जाऊ लागले आहे. भाजप आणि शिंदे गटावर सततच्या टीकेमुळे कमी वेळात जास्त प्रकाशझोतात आल्या आहेत.
सुषमा अंधारे या गोंदियात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, गुवाहाटीतून आल्यावर बस्तान बसायला वेळ लागला. वेळ मिळाला तेव्हा दिल्ली वाऱ्या सुरु झाल्या. मग, यात गोरगरिबांकडे बघायचे कधी असा टोला शिंदे गटाला लगावला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सुधीरभाई ऐका बरं का, त्या माऊलीला का मदत मिळाली नाही म्हणून त्या माउलीच्या गावात गेलो. कारण माहिती आहे का, काही लोकं म्हणतात, सुषमाताई नुसतीचे भाषणं करतात. सुषमाताई फिल्डवर जाऊनही काम करतात, हे याचे पुरावे.
पुढे बोलताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही खोचक टीका केली आहे. त्या म्हणाल्या, गावात गेलो. नातेवाईकाला भेटलो. तुम्हाला मदत मिळाली नाही. बँक अकाउंट नाही. आधार कार्डचं नाही. रहिवासी का नाही. कारण तिला राहायला घरचं नाही. १२ ऑगस्टची घटना होती.
१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी हे भाषण देत होते. भाईओ और बहनौ आझादीचे ७५ साल. हर घर मे तिरंगा लगेला. आम्ही मोदीजींचं ऐकलं. माऊलीला घरचं नाही. तिरंगा कुठं लावयचा. हे प्रश्न आम्ही महाप्रबोधनमधून विचारलं तर झोंबतं असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
पंतप्रधान तीन-चार किलो शिव्या खातात. तर मग पाव-पाव किलो आम्ही बी शिव्या खाऊ, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मोदींवर टीका केली आहे.
जाहिरातीवरचा खर्च भरमसाठ आहे. चाराने की मुर्गी और बारानेका मसाला आहे. योजनांवर किती जाहिरात करावी. राजेहो विरोधकांनी हे प्रश्न विचारले पाहिजे. घरकुलाचे काय झाले.