पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी डान्स करत जल्लोष साजरा केल्याचे दिसले.

पंजाब (Punjab) वगळता बाकी ४ राज्यात आता भाजपाची सत्ता येणार आहे. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेतली आहे.

काल रात्री मोदी यांनी आई हिराबा (Hiraba) यांची त्यांच्या अहमदाबाद (Ahmedabad) येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

नरेंद्र मोदी यांचा २ दिवसीय गुजरात दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी आईची भेट घेत त्यांच्यासोबत पोटभरून जेवण देखील केले आहे. तसेच त्यांचा आशीर्वाद देखील घेतला आहे.

कोरोनामुळे नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेतली नव्हती मात्र मोदी गुजरात (Gujrat) दौऱ्यावर असल्यामुळे ते आईच्या भेटीला गेले आहेत. आईसोबत जेवण करतानाचे मोदींचे फोटो व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ पंकज मोदी (Pankaj Modi) यांच्या घरी मोदींच्या आई रहातात. गांधीनगर जवळच्या रायसन भागात नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू यांचे घर आहे. रात्री ९ वाजता नरेंद्र मोदी घरी गेल्याची माहिती मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe