अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळील एका तुरुंगामध्ये बुधवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये कमीत कमी 41 कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 39 कैदी गंभीर जखमी झाले आहेत.
आग नक्की कोणत्या कारणाने लागली याबाबत माहिती मिळालेली नाही. तुरुंग अधिकारी याचा शोध घेत आहेत. बुधवार, 8 सप्टेंबरला पहाटे जकार्तातल्या तांगेरांग या तुरुंगात आग भडकली.
यावेळी बहुतांश कैदी झोपेत होते. तुरुंगाच्या ब्लॉक-C मध्ये 122 कैदी होते. या ब्लॉकची क्षमता 40 कैद्यांची आहे. याच ब्लॉकमध्ये सर्वाधिक हानी झाली. मृतांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
यात पोर्तुगाल आणि दक्षिण आफ्रिकेतले नागरिक जे या तुरुंगात कैदी होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाचे कायदा आणि मानवी हक्क मंत्री यासोन्ना लाओली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की,
या देशांच्या दुतावासांना घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. तांगेरांग तुरुंगाची क्षमता 1225 कैद्यांना ठेवण्याची आहे. मात्र येथे जवळपास 2 हजार कैद्यांना ठेवण्यात आले होते.
आग लागली तेव्हा ‘सी’ ब्लॉकमध्ये 122 कैदी होते. पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाने आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सर्व जखमी कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम