Maharashtra News:रस्त्याचे काम करत असतात या कामात नियमबाह्य अडथळा जर कोणी आणत असेल तर पोलीस संरक्षणात कामे सुरू करा.
तसेच ही ‘कामे करताना जर तुमच्यावर कोणी दबाव टाकून पैसे मागितले तर मला त्याचे नाव सांगा’ ‘कामे वेळेत व दर्जेदार करा, दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही.
अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबंधी बैठक घेतली.
या बैठकीनंतर बोलताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात विविध यंत्रणांचा सहभाग असतो. हे काम करताना समन्वय आणि सुसूत्रता असेल तर कामे जलदगतीने होऊ शकतात.
या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या बाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, भूसंपादन प्रक्रिया याची माहिती घेतली आहे.
ही कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी योग्य ते निर्देश यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या सहा महिन्याच्या काळात पाथर्डी तालुका हद्दीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ चे काम आणि पालखी मार्गाचे काम पूर्ण होईल.
आघाडी सरकारच्या काळात काही चुकीच्या धोरणामुळे कामे रखडली. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने जिल्हाकडे राज्याचे महसूल मंत्री पद आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रीय महामार्ग सोबतच जिल्ह्यातील इतर सर्वच विकासकामे जलद गतीने केली जातील, असे खा. विखे पाटील म्हणाले.