अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ जाधव (वय 97) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, चार भाऊ, तीन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.

जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी म्हणून ते सर्वांना परिचित होते. निमगाव वाघा येथील दुध डेअरी चेअरमन गोकुळ जाधव व दिलीप जाधव यांचे ते वडिल होत.
शोकाकुल वातावरणात जाधव मळा येथे त्यांचे अंत्यविधी झाला. यावेळी राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम