तणाव दूर ठेवण्यासाठी योग्य आहार महत्वाचा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- इलेक्ट्रोलाइट संतुलित नसल्यास सुद्धा तणाव निर्माण होतो. त्यासाठी तुम्हाला आपल्या आहारात सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी या तीन पदार्थांचे प्रमाण संतुलित ठेवावे लागेल.

हे तीनही फळांमध्ये भरपूर असतात. सकाळी नाश्त्यात फळे खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. फळांमधून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे तुम्हाला काही टक्‍के का होईना, पण तणावमुक्त वाटेल.

द्रव पदार्थ घेण्यात संकोच नको :- द्रव पदार्थ जर शरीरात गरजेप्रमाणे नसतील तर अनेक समस्या येतात. उदाहरणार्थ, डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता. भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात.

तणाव कमी असणे हा त्यातील एक आहे. पण, लक्षात ठेवा की, लिक्विड साखर घातलेले नसावे, गोड नसावे. त्यामुळे वजन वाढण्याची शक्‍यता असते.

तुम्ही पाणी, ताक आणि फळांचा ज्यूस इत्यादी पिऊ शकता. अनेक प्रकारची फळे सुद्धा शरीरात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवितात. कलिंगड, खरबूज यामध्ये प्रमुख आहेत.

व्हिटॅमिन असलेला आहार :- तुम्हाला अशा आहाराची निवड करायची आहे, ज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्त्व संतुलित प्रमाणात असतील. त्याचबरोबर त्यामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असावे.

पण, जेवण असे असावे, ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल आणि व्हिटॅमिन सुद्धा सामील असावेत. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि सोयाबीन यांचे प्रमाण वाढवा. सोयाबीन तणावाच्या हार्मोन्सवर परिणाम करतो.

मॅग्नेशियम आहे आवश्यक :- तुम्हाला असा आहारही घ्यायला हबा, ज्यामध्ये मॅग्ेशियम असेल. याला पूर्ण पुरावा तर नाहीये, पण अनेक वेळा असे दिसून आले आहे की, मॅग्नेशियममुळे तणावाच्या व्यवस्थापनात मदत होते. म्हणून आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि सोबाबीन इत्यादींचे प्रमाण वाढवा.

व्हिटॅमिन सी आहे विशेष :- व्हिटॅमिन सी तणाव वाढविणाऱ्या हार्मोन्स कमी करते. म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात आहाराचा भाग बनवा. फक्त लक्षात ठेवा की, व्हिटॅमिन सी ला गरम करायचे नाही.

त्यामुळे त्यातील विशेष घटक नष्ट होतात. हे एक असे व्हिटॅमिन आहे, जे अनेक साऱ्या ग्लँड जसे एड्रेनन आणि थायमसच्या सूजेलाही कमी करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती बळकट होते, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. व्हिटॅमिन सी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यासाठी याला रोजच्या आहारात जरूर सामील करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe