अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे.
तरी देखील कोविड नियमांची पायमल्ली करणाऱ्या कोपरगाव शहरातील येवला रस्त्यावरील ‘संगम प्रोव्हिजन स्टोअर्स’ सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू ठेवल्याने पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत सात दिवस दुकान सील केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्याही हजाराच्या आसपास राहत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे. तरी देखील अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे कोपरगाव पालिका व शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत ४ वाजेनंतर सुरू असलेल्या संगम प्रोव्हिजन स्टोअर्स सात दिवसांसाठी सील केले आहे. सदर कारवाई पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम