केडगाव उपनगरात ‘या’ उद्योगावर छापा तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सुगंधी तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली असताना देखील छुप्या मार्गाने अनेकजण हा उद्योग करतात.

केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू , सुपारी व इतर साहित्याचा वापर करून मशीनवर मावा तयार करण्याच्या उद्योगावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून ४ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजनु रशीद शेख ( रा.वैष्णवीनगर, केडगाव), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यातील मजनु शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, केडगाव उपनगरातील वैष्णवीनगर भागात एका घराच्या परिसरात काहीजण सुगंधी तंबाखू,

सुपारी व इतर साहित्याचे मिश्रण करून मशीनवर मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकास सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. त्याठिकाणी एक टेम्पो, सुगंधी तंबाखू, मावा बनविण्याचे मशीन, बारीक सुपारी, चुना असा ४ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe