Railway Fact : जगभरात महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाई वाढली असल्याने आता वाहतुकीची साधने पूर्वीपेक्षा खूपच महाग झाली आहेत. जरी असे असले तरी रेल्वे ही गरीब आणि सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.
लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत आहेत. रेल्वे ट्रॅक खूप असतात. त्यामुळे अनेकांना रेल्वेचा चालक हा योग्य मार्ग कसा निवडतो? हा चालक रेल्वेच्या योग्य मार्गाचा पत्ता कसा शोधत असतो? असे अनेक प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे.
कोणत्या ट्रॅकवरून ट्रेन चालवावी?
याबाबत रेल्वे मंत्रालयाने आपल्या एका ट्विटमध्ये माहिती दिली आहे की, समजा समोर एकापेक्षा जास्त ट्रॅक असेल तर लोको पायलटने कोणत्या ट्रॅकवर जावे, याची माहिती होम सिग्नलवरून समजते. हे लक्षात घ्या की लोको पायलटने कोणत्या ट्रॅकवरून ट्रेन पुढे न्यावी आणि कोणत्या ट्रेनसाठी कोणता ट्रॅक निश्चित करण्यात आला आहे,ते हा सिग्नल सांगतो.
होम सिग्नलची होते मदत
होम सिग्नल हा लोको पायलटला ट्रेन योग्य मार्गावर नेण्यासाठी मदत करतो. ज्या ठिकाणी हा ट्रॅक एकापेक्षा जास्त भागांमध्ये विभागला गेला आहे त्या ठिकाणी सिग्नल 300 मीटर आधी सेट करण्यात येतो. इतकेच नाही तर लोको पायलटला योग्य ट्रॅक सांगण्याशिवाय, ते त्याला ट्रेनला सुरक्षित स्थानकावर आणण्यासाठी सूचित करतो.
उपस्थित असतात 2 लोको पायलट
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व गाड्यांमध्ये नेहमी दोन ड्रायव्हर उपस्थित असतात, त्यापैकी एक लोको पायलट तर दुसरा असिस्टंट लोको पायलट असतो. समजा एखादी इमर्जन्सी असेल म्हणजे मुख्य लोको पायलटची तब्येत बिघडली असेल तर असिस्टंट लोको पायलट ट्रेनची कमान घेतो आणि पुढच्या स्टेशनवर नेतो, जिथे इतर व्यवस्था करण्यात येते.