Railway News : कुठल्याही मदतीसाठी रेल्वेची एकच हेल्पलाइन ! प्रवाशांना मिळणार…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

ओरिसामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आपातकालीन स्थितीमध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या १३९ या हेल्पलान क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

त्यामुळे तातडीने मदत मिळू शकणार आहे. प्रवाशांना सर्व माहिती तक्रारी आणि समस्यांसाठी एकच हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवण्याची प्रवाशांना गरज नाही. देशभरात केवळ एकाच हेल्पलाइनवर मदत मिळणार आहे.

अनेक भाषा उपलब्ध

रेल्वेने १३९ हा हेल्पलाइन क्रमांक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. तो आयव्हीआरएस अर्थात इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम) आधारित आहे.

त्यामुळे भाषेची कोणतीही अडचण प्रवाशांना येणार नाही रेल्वेतील सुरक्षेसंबंधी अडचणीत १३९ हेल्पलाइनवर फोन करता येणार आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान कोणतीही वैद्यकीय मदत हवी असल्यास त्यावर कॉल करता येईल.

अपघाताची माहिती, रेल्वे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानकासंबंधी तक्रारी, कारवाईची स्थिती हेदेखील जाणून घेता येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या मोबाइलमध्ये १३९ क्रमांक ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सेवा मिळतील

या हेल्पलाइनवर प्रवाशांना रेल्वेविषयी सखोल माहिती मिळू शकेल. पीएनआर स्थिती, तिकीट उपलब्धता, रेल्वेचे वेळापत्रक, तसेच आरक्षणासंबंधी माहिती १३९ वरुन मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe