Railway Update : रेल्वेने दिला इशारा! तिकीट बुक करत असताना चुकूनही करू नका ही चूक, नाहीतर बँक खाते रिकामे झालेच समजा

Railway Update : जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक इशारा दिला आहे. सध्या प्रवाशांची ‘irctcconnect.apk’ या अ‍ॅपमुळे फसवणूक केली जात आहे.

त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना हे अ‍ॅप डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही हे अ‍ॅप तिकीट बुक करताना वापरले तर तुमचीही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तिकीट बुक करताना विशेष काळजी घ्या.

अशी होत आहे फसवणूक

फसवणूक करणारे IRCTC असल्याचे भासवतात आणि ते प्रवाशांची वैयक्तिक माहिती जसे की तुमचे UPI तपशील आणि इतर महत्त्वाची क्रेडिट/डेबिट कार्ड बँकिंग माहिती जमा करतात. त्यामुळे चुकूनही हे अॅप डाऊनलोड करू नका. कारण कोणत्याही संशयास्पद अॅप्लिकेशनबाबत सतर्क राहणे खूप गरजेचे आहे.

स्वतः सुरक्षित राहणे महत्त्वाचे

कृपया चुकूनही हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करू नका तसेच अशा फसवणूक करणाऱ्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे. इतकेच नाही तर Google Play Store किंवा Apple Store वरून सतत IRCTC चे अधिकृत ‘IRCTC Rail Connect’ मोबाईल अॅप डाउनलोड करा. हे लक्षात घ्या की IRCTC त्यांच्या ग्राहकांना त्यांचा पिन, OTP, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड तपशील, नेट बँकिंग पासवर्ड किंवा UPI यांसारख्या अनेक तपशीलांसाठी कधीच कॉल करत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe