Indian Railways: तुम्ही ट्रेनने (train) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. रेल्वेने (Railways) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने प्रीमियम गाड्यांमधील (premium trains) सेवा शुल्क रद्द केले आहे.
आता प्रवाशांना 50 रुपयांची बचत होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला (IRCTC) परिपत्रक जारी केले आहे. याआधी प्रीमियम ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची ऑर्डर देण्यासाठी IRCTC 50 रुपये सेवा शुल्क (Service Charges) आकारत होते.

चहा-पाण्यासाठी सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही
रेल्वेच्या नव्या नियमांनुसार त्या प्रवाशांना सेवा शुल्कातून दिलासा मिळणार आहे. ज्यांनी तिकीट काढताना जेवायचे निवडले नाही. प्रवाशांना चहा-पाण्यासाठी सेवा शुल्क भरावे लागणार नाही. याचा फायदा आता राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना होणार आहे. मात्र, रेल्वेच्या नियमानुसार नाश्ता आणि जेवणावर अजूनही सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे. जेवण आणि स्नॅक्ससाठी प्रवाशांना 50 रुपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.

रेल्वेचे नवीन नियम समजून घ्या
ट्रेनमध्ये आगाऊ (advance) जेवण बुक न करणाऱ्यांकडून सेवा शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने 50 रुपये सेवा शुल्क रद्द केले असले तरी. मात्र यासोबतच न्याहारी आणि जेवणाचे दरही वाढवण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी वेगवेगळे दर मोजावे लागतील. राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट बुक करताना जेवण न घेतल्यास नाश्त्यासाठी 190 रुपये मोजावे लागतील. तर जेवणासाठी 240 रुपयांऐवजी 290 रुपये मोजावे लागणार आहेत.

तर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नाश्त्यासाठी 155 रुपयांऐवजी 205 रुपये आणि संध्याकाळी नाश्त्यासाठी 105 रुपयांऐवजी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. तर लंच आणि डिनरसाठी 244 ऐवजी 294 रुपये मोजावे लागतील.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क बंदी
केंद्र सरकारने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मधील सेवा शुल्काबाबत यापूर्वीच कडकपणा दाखवला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सेवा शुल्काबाबत आदेश दिले होते. त्यानुसार बिलामध्ये स्वयंसेवी सेवा शुल्क आकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा इतर कोणतीही संस्था कोणतेही सेवा शुल्क आकारू शकत नाही.