अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे.
हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. ठाकरे स्वत: उपस्थित राहणार नसल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविला होता.
भोंग्यांवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येतील. या बैठकीसाठी विविध पक्षांच्या २८ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे इम्तियाज जलील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, धनंजय शिंदे यांचा समावेश आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ठाकरे यांनी तीन मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवावेत अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यासंबंधी योग्य ती नियमावली तयार करण्याचे राज्य सरकारने ठरविले.
ती एकतर्फी न करता सर्व पक्षांना विश्वासात घेण्याची भूमिका गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी घेतली. त्यानुसार ही बैठक बोलाविण्यात आली आहेp