Ram Mandir Train Booking : राम नगरी अयोध्येसाठी विशेष ट्रेनचे कसे कराल बुकिंग? एका क्लिकवर पहा सर्व प्रक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:
Ram Mandir Train Booking

Ram Mandir Train Booking : प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. उद्यापासून देशातील राम भक्तांना राम मंदिर खुले केले जाणार आहे.

23 जानेवारी म्हणजेच उद्यापासून राम भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. तुम्हालाही अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेईचे असेल तर तुम्ही विशेष रेल्वेचे बुकिंग IRCTC च्या App वरून सहज करू शकता.

केंद्र सरकारकडून अनेक ठिकाणांहून अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच एक विमानतळ देखील बनवण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून 200 विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे. आयआरसीटीसी अॅपद्वारे तिकीट बुक करून तुम्ही देखील श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता.

अयोध्येला जाणाऱ्या विशेष ट्रेनचे बुकिंग फक्त IRCTC च्या अॅपवरूनच करता येईल.

तुम्हाला IRCTC च्या अॅपवरून बुकीं करायचे असेल तर तुम्ही अधिकृत नोंदणीकर्ता असणे आवश्यक आहे.

सर्वात प्रथम खात्यात लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ट्रेनवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला बुक तिकीट पर्यायावर जावे लागेल.
आता तुम्हाला तुमच्या राज्यातील स्टेशनवरून अयोध्या धाम जंक्शन (AY) साठी तारखेसह ट्रेन शोधावी लागेल.
ट्रेनची यादी उघडल्यावर, तुम्ही Qasal सह सीट उपलब्धता तपासू शकता.
प्रवाशांच्या तपशीलासह पेमेंट पर्यायावर क्लिक करून पेमेंट केल्यानंतर तिकीट बुक केले जाईल.

केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून राम भक्तांचा प्रवास सुखकर आणि सहज होण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही देखील IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe