उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन राणे पुत्रांची टीका; म्हणाले…

Published on -

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे आणि भाजपचे नेते निलेश राणे या दोघांनीही टीका केली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले असून आता या मुलाखतीवर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपवरही टीकास्त्र सोडलं आहे.

ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे आणि भाजपचे नेते निलेश राणे या दोघांनीही मुलाखतीमधील एक क्लिप शेअर केली आहे. नितेश राणे म्हणाले ‘मानलं तुम्हाला’ अशी कॅप्शन देत उद्धव ठाकरेंना उपहासात्मक टोला लगावला आहे. अशी मुलाखत संजय राऊतच घेऊ शकतात, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!