अहमदनगर ब्रेकींग: आत्महत्येची धमकी अन् लग्नाचे आमिष दाखवून विवाहित पुरूषाकडून काॅलेजच्या युवतीवर अत्याचार

Published on -

युवतीवर विवाहित पुरूषाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापु बाबासाहेब मुठे (रा. भिंगार) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. ही युवती 22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते 24 डिसेंबर 2021 च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉटवर ही घटना घडली.

बापु मुठे हा फिर्यादी युवतीला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु जर मला नकार दिला तर मी औषध घेवुन आत्महत्या करील, अशी धमकी दिल्याने फिर्यादी युवती बापु सोबत गेली.

23 डिसेंबर 2021 च्या रात्री देवगाव येथील रिसॉटवर बापुने फिर्यादी युवतीवर अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी युवतीने तु माझ्यासोबत असे का केले,

अशी विचारणा बापुकडे केली असता तो तिला म्हणाला, मी माझी पहिली पत्नी हिला फारकत देणार आहे व तुझ्यासोबत लग्न करणार आहे.

घटना घडल्यानंतर पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून बापु मुठे विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe