MC Stan Bigg Boss 16 Winner : पुण्याचा रॅपर अशी ओळख असणारा एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदी 16 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर मराठमोळ्या शिव ठाकरेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ‘बिग बॉस’चा विजेता होताच एमसी स्टॅन खूप मालामाल झाला आहे.
त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी तसेच त्याच्यावर इतर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. पुण्याच्या या रॅपरने टीव्ही दिग्गजांना ‘बिग बॉस 16’ ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस 16’ च्या विजेत्याचे नाव समोर आले असून यावेळी या शोचा विजेता एमसी स्टॅन ठरला आहे. स्टॅनने मराठमोळ्या शिव ठाकरेचा पराभव करत या शोची ट्रॉफी जिंकली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी टॉप 5 मध्ये शालीन भानोत, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांचा समावेश होता.
एमसी स्टॅन विजेता होण्याअगोदर, प्रत्येकजण शिव ठाकरे या शोचा विजेता असणार असा अंदाज बांधत होता. परंतु,शिव ठाकरे हा उपविजेता ठरला आहे.बिग बॉस 16 च्या अंतिम फेरीत एमसी स्टॅनने शिव ठाकरेचा पराभव केला. त्याच वेळी, प्रियांका चहर चौधरी यापूर्वीच बाहेर पडल्या होत्या.
तब्बल चार महिन्यांपासून सुरू असलेला सलमान खानचा शो बिग बॉस 16 चा फिनाले काळ संपला आहे. हा शो एमसी स्टॅनने आपल्या नावावर करत या शोची ट्रॉफी जिंकली आहे.